Homeताज्या बातम्याकेज उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार ?गोळ्यांचा तुटवडा औषधा अभावी रुग्णाचे बेहाल!

केज उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार ?गोळ्यांचा तुटवडा औषधा अभावी रुग्णाचे बेहाल!

केज उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार ?गोळ्यांचा तुटवडा औषधा अभावी रुग्णाचे बेहाल!

केज/प्रतिनिधी

केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घाणीचे साम्राज्य माजले असून दुर्गंधी पसरली आहे, सातत्याने उपजिल्हा रुग्णालयात औषध गोळ्यांचा तुटवडा भासत असल्यामुळे औषधा अभावी रुग्णाचे बेहाल होत आहेत असे रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांकडून ऐकण्यास मिळत आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे थंडी ताप, सर्दी, खोकला, उलटी-संडास, गॅस्ट्रो, टायफाईड यासह साथीचे आजार चालू आहेत. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात केज तालुक्यासह इतरही अनेक ठिकाणाहून रुग्ण उपचार घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात येतात. परंतु उपजिल्हा रुग्णालयामध्ये सतत पुरेसा औषध गोळ्यांचा साठा उपलब्ध नसतो सतत औषध गोळ्या रुग्णालयामध्ये रुग्णाला मिळत नसल्यामुळे रुग्णाचे व रुग्णाच्या नातेवाईकांचे बेहाल होत असल्याचे चर्चा नातेवाईकांकडून ऐकण्यास मिळत आहे.उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक जेवण्यासाठी बसतात त्या ठिकाणी स्वच्छता नसते सतत कचरा पडलेला असतो त्याचबरोबर रुग्णालयाच्या परिसरात रुग्णाकरिता जेवणाची एक कॅन्टींग आहे त्या कॅन्टीनचे घाण पाणी व भांडी धुतलेले, घासलेले सांडपाणी आणि खराब खरकटे अन्न उघड्यावरच टाकण्यात येत आहे त्यामुळे परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य माजले असून त्याची दुर्गंधी पसरली आहे. सदर ठिकाणच्या सांडपाण्यावर व खरकट्या अन्नावर माशा बसत आहेत त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण घाणीमुळे वाढले आहे अशा दूषित ठिकाणीच काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक जेवन करत आहेत त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयातील संडास बाथरूम देखील अस्वच्छ आहेत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये लघुशंकेला शौचाला जाण्याची सोय नाही त्या ठिकाणी बाथरूम हे पूर्णपणे ब्लॉक झालेले असल्यामुळे दुर्गंधी येत आहे. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना या दूषित वातावरणामुळे रुग्णाचे नातेवाईक देखील आजारी पडण्याची शक्यता नाकरता येत नाही असे नागरिकांतून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!