हजरत मोहम्मद पैगंबर जयंती जुलूस वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन !
जनक्रांती न्युज प्रतिनिधी/ तोफिक मोमीन कळंब शिराढोण
कळंब तालुक्यातील शिराढोण येथे दि. 05 सप्टेंबर 2025 रोजी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती उत्सव निमित्त निघणाऱ्या जुलूस कमिटीची बैठक संपन्न झाली ज्यात जुलूस कमिटी अध्यक्ष पदी श्री.हाजी मंजूर खुरेशी,उपाध्यक्ष पदी श्री. अब्दुल सलाम आ.समद डांगे यांची तर सचिव पदी,श्री.इस्माईल खूरेशी यांची निवड करण्यात आली यात कमिटी सदस्य अजीज आतार, इकबाल तांबोळी , बाबा खतीब, साबेर खुरेशी, फिरोज खुरेशी, नसिर खुरेशी, न्याजोद्दिन शेख ,खय्युंम खुरेशी, या सर्वांच्या उपस्थितीत ही बैठक शांतता पूर्ण संपन्न झाली . तसेच कमिटी च्या सर्व पदाधिकारी सोबतच आयात डांगे, शकील,डांगे,काका डांगे ,यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक ,पोलीस ठाणे , शिराढोण यांना कार्यक्रमाच्या परवानगी संधर्भात निवेदन देण्यात आले .





















