स्थानिक आमदारांचा प्रशासनावर दबाव आहे का?/हैदराबाद गॅझेट नुसार अर्ज का स्विकारण्यात येत नाही?जरांगे पाटील यांनी लक्ष घालण्याची गरज!
अंबाजोगाई/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील व अंबाजोगाई तालुक्यातील प्रशासन हैदराबाद गॅझेट नुसार कोणत्याही विषयावर अर्ज स्विकारत नसल्याचे समजले जात आहे व सत्य परिस्थिती अशी आहे की हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण प्रमाण पत्र काढण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या मराठा बांधवांना सांगितले जात आहे की आणखी आम्हाला आदेश आले नाहीत असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे मग नेमके गोड बंगाल काय आहे बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यात हैदराबाद गॅझेट नुसार अर्ज स्विकारण्यात येत आहेत सगळे प्रशासन जबाबदारीने जिआर प्रमाणे व हैद्राबाद गॅझेट प्रमाणे काम करत आहे परंतु परळी व अंबाजोगाईच्या प्रशासनाला नेमका कोनाचा आदेश पाहीजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तसेच तेथील लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नकार देत आहे का किंवा हैदराबाद गॅझेट नुसार अर्ज स्वीकारण्यासाठी नकार देत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे कारण परळी व अंबाजोगाई येथील स्थानिक आमदारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता यांच्या मागे यांचा तर हात नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी परळी व अंबाजोगाई येथील नागरिक या विषयी लवकरच संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे समजले जात आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















