Homeताज्या बातम्याबाळराजे आवारे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,...

बाळराजे आवारे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, तहसीलदार यांना जमले नाही !

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील केज शहरात सोमवारी सकाळी कोरडेवाडी साठवण तलाव मंजूर करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या शांततामय आंदोलनाला दुपारपर्यंत हिंसक वळण मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रस्ता रोकोदरम्यान काही आंदोलक अचानक आक्रमक झाले आणि महामंडळाच्या बसगाड्यांवर दगडफेक केली. काही गाड्यांचे नुकसान झाले असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत.अहिल्यानगर–अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासूनच कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी शेकडो नागरिकांनी ठिय्या मांडला होता. गेल्या तीन तासांहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होते. रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधून आंदोलन संपवण्याचे वारंवार प्रयत्न केले. मात्र, शासनाकडून मागणी मान्य होणार नाही, हे लक्षात येताच आंदोलक अधिक आक्रमक झाले.दगडफेकीत बसमधील प्रवासी जखमी तणाव वाढत असतानाच काही तरुणांनी हातातील दगड उचलून एसटी महामंडळाच्या बसगाड्यांवर दगडफेक केली. काही बसांच्या काचा फुटल्या, वाहनांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवासी दगड लागून जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांकडून लाठीचार्ज, काहींना घेतले ताब्यात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दगडफेक थांबवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. काही आंदोलकांनी घटनास्थळावरून पळ काढला असून काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, कोरडेवाडीत एका तरुणीचे याच मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासन दखल घेत नसल्याने शेतकरी अधिक संतप्त झाले होते. संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!