Homeताज्या बातम्याशेवगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट/सहा मंडळांच्या अध्यक्षांसह सहा डीजे मालकांवर...

शेवगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट/सहा मंडळांच्या अध्यक्षांसह सहा डीजे मालकांवर गुन्हे दाखल !

शेवगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट/सहा मंडळांच्या अध्यक्षांसह सहा डीजे मालकांवर गुन्हे दाखल !

अहिल्यानगर/प्रशांत बाफना जिल्हा प्रतिनिधी

शेवगाव शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे लावून त्याव्दारे सिस्टीमवर कर्णकर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केले. या प्रकरणी सहा मंडळांच्या अध्यक्षांसह सहा डीजे मालकांवर ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुरुवार ता.४ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हा प्रकार घडला. याबाबत माहिती अशी की, शहरातील मिरी व पाथर्डी रस्त्यावर काल गुरुवार ता.४ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. यामध्ये मंडळांनी मिरवणुकीमध्ये डीजे सिस्टीमवर कर्णकर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केले. पोलीस प्रशासनाने आंबेडकर चौकामध्ये सर्व डीजेंचे ध्वनी तीव्रता मोजमाप केले. त्यामध्ये मोठया प्रमाणात ध्वजी प्रदुषण केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील कर्मचा-यांनी सहा मंडळाचे अध्यक्ष व सहा डीजे चालकांविरुध्द सर्वेच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यामध्ये शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश बबन वखरे (रा.शेवगाव) व डीजे वाहन क्रमांक एम.एच.१२ सीटी ९२१६ चे मालक, जगदंबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शरद जाधव (रा.शेवगाव) व डीजे वाहन क्रमांक एमएच ०४ ए इ ५५९० चे मालक, स्पंदन ग्रुपचे अध्यक्ष ऋषिकेश श्यामराव वाघिरे (रा.शेवगाव) व डीजे वाहन क्रमांक एम एच १० झेड १८४६ चे मालक, द्रोणाज ग्रुपचे अध्यक्ष गोविंद लक्ष्मण लांडे (रा.शेवगाव) व डीजे वाहन क्रमांक एम एच ०४ बी झेड ९०५० चे मालक, समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा दगडू धनवडे ( रा.शेवगाव ) व डीजे आयशर गाडी (क्र.एमएच-१४ एएच २३४९ मालक, पवाज् ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण अरुण भारस्कर (रा.शेवगाव) व डीजे वाहन क्रमांक एम एच १६ एई १७३९ चे मालक अशा १२ जणांचा यामध्ये समावेश आहे.या प्रकरणी बंदोबस्तावर असणा-या सहा पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील 12 जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३,१५ व ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० चे कलम ३,४,५,६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चौकट : तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तालुक्यामध्ये डीजे वाजविण्यास बंदी घातली होती. त्यामुळे सण, उत्सव व लग्नामध्ये देखील कोणीही डीजे वाजविण्याचे धाडस करीत नव्हते. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा शहरामध्ये डीजे वाजवण्यास सुरुवात झाली. या डीजे मिरवणुकीमुळे शहरातील वातारवण बिघडून येथे दंगल झाली. त्यामुळे अनेक युवकांवर गुन्हे दाखल झाले. काल गुरुवारी देखील आंबेडकर चौकामध्ये समोरासमोर डीजे आल्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र यावेळी पोलीसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे पोलीसांच्या कार्यपध्दतीवर नागरिकांनी संशय व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!