श्री एक मुखी दत्त मंदिर देवस्थान माकेगावमाकेगाव देवस्थानचा रस्ता गेला वाहून/आमदार नमीता मुंदडा एकदा प्रवास करा रस्त्याने?
अंबाजोगाई/ प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव दत्त देवस्थानच्या रस्त्याची अत्यंत दुरअवस्था झालेली आहे तसेच रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे तरी संमंधीत गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली पाहिजे असे मत नागरिकांन कडुन व्यक्त करण्यात येत आहे तसेच रस्ता वाहुन गेल्या मुळे नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे जर एखादे मोठ्या वाहतूकीचे वाहन जर तेथुन घेऊन जायचे म्हटले तर पलटी होऊन अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आमदार नमीता मुंदडा यांनी एकदा रस्त्यावरून प्रवास करावा म्हणजे समजेल की रस्त्याची दुरवस्था कशी झाली आहे कारण सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या गुत्तेदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





















