Homeताज्या बातम्यादारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एका व्यक्तीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न...

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एका व्यक्तीचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न !

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:-दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने ४५ वर्षीय व्यक्तीचा गमजाने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील वडगाव (ज) येथे घडली आहे आरोपीने पीडित व्यक्तीला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले व त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.याप्रकरणी बाळासाहेब नरसिंग गाढवे (वय ४५ रा. वडगाव ज) यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या तक्रारीनुसार, सोन्या उर्फ निखील शिवाजी शिंदे (रा. वडगाव ज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २५ ऑगस्टच्या रात्री पावणेनऊ ते २६ ऑगस्टच्या सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान वडगाव (ज) येथील तुकाराम जगताप यांच्या किराणा दुकानासमोर घडली. बाळासाहेब गाढवे यांना आरोपी सोन्या शिंदे याने अडवले आणि “दारू पिण्यासाठी पैसे दे, नाहीतर तुला ठार मारतो,” अशी धमकी दिली गाढवे यांनी पैसे देण्यास नकार देताच आरोपीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्याला म़ठा गमजा आवळला त्यानंतर शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले एवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेतले आणि पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाला बाळासाहेब गाढवे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सोन्या शिंदे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११९(१), ११५(२), १२६(२), १२५ (ए) (जबरी चोरी), ३५२, ३५१(२), (३) (गंभीर दुखापत) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. येरमाळा पोलीस आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!