प्रभाग क्र. 23 मध्ये आमेर खान यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी/नगरपालिका निवडणुकीपूर्वी जनतेतून उमेदवारीसाठी वातावरण तापले!
बीड/प्रतिनिधी
नगरपालिका निवडणुका जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मध्ये एम. आय. एम. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आमेर खान उर्फ एके पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे. या भागातील नागरिकांनी आमेर खान यांनी या निवडणुकीत अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करून रिंगणात उतरावे अशी मागणी केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून एम. आय. एम. पक्षात सक्रिय राहून पक्षाच्या धोरणे व विचारधारेनुसार कार्य करणारे आमेर खान हे एकनिष्ठ व परिश्रमी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे.प्रभाग क्रमांक 23 हा एम. आय. एम. पक्षाचा मजबूत गड मानला जातो. या भागात एम. आय. एम. ला मानणारे मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या वेळीही पक्षाच्या उमेदवाराला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.युवा नेतृत्व म्हणून आमेर खान हे स्थानिक पातळीवर परिचित व लोकप्रिय चेहरा ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांची फौज उभी आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.पक्ष कार्यकर्ते आणि स्थानिक युवकांमध्येही आमेर खान यांच्या उमेदवारीबद्दल उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. नागरिकांच्या अपेक्षा, युवकांचा पाठिंबा आणि प्रभागातील एम. आय. एम. चा मजबूत मतदार वर्ग लक्षात घेता, या निवडणुकीत आमेर खान यांनी रिंगणात उतरल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.





















