Homeताज्या बातम्याडिकसळ-इस्लामपुरा भागात पायाभूत सुविधा पूर्ण-अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश

डिकसळ-इस्लामपुरा भागात पायाभूत सुविधा पूर्ण-अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश

डिकसळ-इस्लामपुरा भागात पायाभूत सुविधा पूर्ण-अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- राज्य शासनाच्या अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या सत्तर लाख निधीचा वापर करून मौजे डिकसळ (इस्लामपुरा) परिसरात महत्त्वाची विकासकामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत.या सर्व विकासकामांची प्रेरणा व पुढाकार शिवसेनेचे नेते मा.अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नातून घेण्यात आली असून, शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते आणि डिकसळचे माजी सरपंच अमजद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली आहे तरी याप्रमाणे निधी उपलब्ध झाला आहे रफीक शेख यांचे घर ते वहाब मनियार यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता दहा लाख,मोहम्मदीया मस्जिद ते अस्सलम तांबोळी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता दहा लाख,इम्रान शेख यांचे घर ते नसीर मोमीन यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता दहा लाख,युसुब सय्यद यांचे घर ते अमजद मिर्जा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता दहा लाख,मौजे डिकसळ मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता दहा लाख, मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत संरक्षण भिंत बांधणे दहा लाख,मक्का मस्जिद जवळ पावर ब्लॉक उभारणी दहा लाख असा एकूण मंजूर व पूर्ण निधी सत्तर लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे या कामांमुळे इस्लामपुरा भागात दळणवळण,सार्वजनिक आरोग्य,धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवेश, आणि सुरक्षिततेसंबंधी सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्या आहेत स्थानिक रहिवाशांनी या कामांचे स्वागत करत शिवसेनेच्या नेतृत्वाचे विशेष आभार मानले आहेत.शिवसेना पक्षाचे लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्य यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे, असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. या विकास कामांबाबत डिकसळ ग्रामपंचायतीचे सदस्य इम्रान मुल्ला, मोबीन मनियार व सौ. इर्शाद रफीक सय्यद यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.तसेच त्यांनी शिवसेनेचे नेते मा.अजित दादा पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आणि म्हणाले की, या विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!