Homeताज्या बातम्यागोर गरीब,असहाय्य जनतेची सेवा करणारा आदर्श समाजसेवक" नरहरी काकडे" उतरणार पंचायत समिती...

गोर गरीब,असहाय्य जनतेची सेवा करणारा आदर्श समाजसेवक” नरहरी काकडे” उतरणार पंचायत समिती निवडणुकी च्या मैदानात.!

गोर गरीब,असहाय्य जनतेची सेवा करणारा आदर्श समाजसेवक” नरहरी काकडे” उतरणार पंचायत समिती निवडणुकी च्या मैदानात.!

केज/रोहन गलांडे

शिवश्री नरहरी काकडे केज तालुक्यातील साबला गावची जन्मभूमी असणारे, परिस्थिती जेमतेम, शेतीवर उदर निर्वाह असणारं, कुटुंब त्यामध्ये नरहरी नावातच संतांच दर्शन असणारं व्यक्तिमत्व, शिलाई काम करून आपल्या कर्तत्वाचा ठसा जनसामान्यावर उमटवणारं दिलदार व्यक्तिमत्व. लहानपणा पासुनच समाजकार्याची आवड असणारे “नरहरी” काकडे सर असहाय्य, दिन, गोरगरीब यांच्या मदतीला धावून जाणारे काकडे सर यांच्या कर्तत्वाला साबला तसेच तालुक्यातील लोक गोरगरीबांचा दाता म्हणून ओळखतात, काकडे सरांनी गावामध्ये आपल्या स्वखर्चाने बरीच विकास कामे केली परंतु आर्थिक बाजु अपुरी पडत असल्याने कांही लोकोपयोगी कामांना अडचणी येत असून सुद्धा स्वतःच्या शेती उत्पादनाचा विचार न करता उत्पादनातून येणारे पैसे गावासाठी तसेच जनतेसाठी वापर करणारा आजच्या काळातील लोकहितवादी, समाजवादी समाज सेवकाने नकळत पणे जनतेच्या मनात घर केल,जनता मनोमन “नरहरी” काकडे सरांना दिनांचा कैवारी या नरजेतून पहात असून या असामान्य व्यक्तिमत्वाच्या घरी कुठलाच राजकिय वारसा नसताना अंगी समाज सेवेचे ध्येय असणारा ध्येयवेडा  अडी अडचणीच्या वेळी, गोरगरीबांना मदत, त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाला सहकार्य, गरीबांच्या लग्न कार्याला स्वतः झोकून देवून मदत करणे, गावच्या तसेच पंचक्रोशी तील कुठलाही व्यक्ति अडचणीत आला तरी ओठावर “नरहरी” काकडे सरांचे नाव घेणाऱ्या जनमाणसांच दैवत असणाऱ्या, नरहरी यांना साक्षात जनतेच्या कल्याणासाठी भगवंताने देवदूत म्हणून पाठवल्या चा अनुभव येतो, गोरगरीबांच्या मदतीसाठी, दवाखाना , लग्नकार्य , शैक्षणीक सुविधा, सुखसुख-दुखाच्या, तसेच कुठल्याही प्रासंगीक समयी “नरहरी” काकडे सरांचे कार्य मोलाचे आहे, आज रोजी त्यांच्या पत्नी जनाबाई काकडे या साबला गावच्या सरपंच आहेत “नरहरी” काकडे यां च्या समाज कार्यात “जनाबाई” यांचेही योगदान आहे . तसेच जनाबाई काकडे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच साबला नगरीत स्वच्छता मोहीम राबवण्याचे काम हाती घेतले कारण गावातील जनतेच्या आरोग्याची घेणे ही काळाची गरज आहे . तसेच जनाबाई काकडे यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या मानधनातुन ग्रामपंचायत कार्यालयासाठी कुलर घेवुन दिले . तसेच  गावासाठी फार मोठे योगदान असुन समाज कार्यात कुठलीच कसर न ठेवता जनतेच समाधान, सुख कशात आहे त्यासाठी अहोरात्र झटणारे दांपत्य म्हणजे “नरहरी आणि जनाबाई” काकडे दांपत्य. शिक्षक असून सुद्धा नरहरी काकडे सरां मध्ये साबला तसेच पंचक्रोशीतील लोक देव माणसाच्या रुपाने पाहतात आहेत कारण परमेश्वर जसा संकट काळी धावून येतो त्याप्रमाणे नरहरी आणि जनाबाई काकडे दांपत्य जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. काकडे सरांना त्यांच्या समाज कार्यासाठी तीन वेळेस राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले असून हा पुरस्कार म्हणजे माझा नसून माझ्या गोरगरीब जनतेचा असून मी त्यांच्या साठी निस्वार्थ पणे अहोरात्र काम करणार अशी मनाशी खुनगाठ बांधलेले नरहरी काकडे सर म्हणजे कलीयुगातील एक प्रामाणिक, सच्चा, निस्वार्थ, लोककल्याण्यासाठीस्वतः ला वाहून घेतलेला देवदुत,लढवय्या च ठरत असून अर्ध्या रात्रीला गोर-गरीब,असहाय्यांच्या,दीनांच्या मदतीला धावून जाणारे निस्वार्थ व्यक्तिमत्व म्हणजे “नरहरी” काकडे सर.जनाबाई काकडे या साबला गावच्या सरपंच असून आज गावामध्ये सुलभ शोचालय, घरकुल योजना, रस्ते, पाणी, जलजीवन, पानंद रस्ते, रोजगार निर्मीती, वीज, दवाखाना, शैक्षणीक सुविधा, जेष्ठांचा सन्मान, गोरगरीबांना न्याय, तसेच गावच्या विकासाला सर्वतोपरी चालना देवून गावचा विकास करून साबला गावचे नाव आज अभिमानाने जिल्हयाच्या नकाशा वर झळकत असून त्यामागे नरहरी काकडे आणि जनाबाई काकडे यांचे गावासाठी तसेच संपूर्ण पंचक्रोशीतील जनतेसाठी निस्वार्थ भावनेने केलेले सामाजिक कार्य.नावातच संत दर्शनाचा वास असणारे काकडे सरांना समाज कार्याची आवड हि जन्मजात असून त्यांच्या सुविद्य पत्नी “जनाबाई” या सुद्धा सरांच्या कार्यामध्ये स्वतःचे अमुल्य योगदान समाज कार्यासाठी देत असून त्यांना ही अशीच कष्टकरी, गरीब, असहाय्य जनतेची सेवा करण्याची आवड आहे, या दांपत्यां च्या समाज कार्याच आणि गावातील विकास कामांच गोर गरीब जनतेतून खरोखरच कौतूक व्यक्त होत आहे यावर च न थांबता गावच्या सरपंच समाज सेवक नरहरी काकडे यांच्या सुविद्य पत्नी सौ. जनाबाई काकडे यांनी त्यांच्या योग्य मार्ग दर्शना खाली साबला गावचा चेहरा मोहरा बदलून गावच्या विकासाला चालना देण्याचे काम अविरत चालू ठेवले आहे  दिनांक : 03     जानेवारी , 2023 रोजी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यापासून आजपर्यंत साबला नगरीत अनेक  विकास कामे केली असून  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. साबला तसेच आनंदवाडी वस्ती  येथील ही शाळा दुरुस्तीचे काम, जलजीवन योजनेचे काम जवळपास 80 % पुर्ण झालेले असून पूर्णत्वाकडे आहे . गावात मागासवर्गीय वस्तीमध्ये सिमेंट रस्ता काम, आनंदवाडी वस्ती येथेही सिमेंट रस्ता काम , श्री उत्तरेश्वर महाराज जागृत देवस्थान कडे जाणाऱ्या रस्त्या चे सिमेंट काम, हनुमान महाराज मंदिर परिसरात सिमेंट रस्ता काम , व हनुमान महाराज सभागृह दुरुस्ती काम , श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर परिसरात वृक्षारोपण , मंदिर परिसरात दोन सभागृह बांधकाम पूर्ण  , तसेच दत्त वस्ती  , आनंदवाडी वस्ती  , भिम नगर  , बौद्ध नगर या सर्व चारही वस्तीवर एकुण चार सिंगल फेज विद्युत पुरवठा डेपो मंजूर करून घेण्यात आले आहेत  , तसेच  ART संस्था , यवतमाळ . यांच्या सहकार्याने 2000  हजार मीटर लांब नदीचे खोलीकरण व रुंदीकरण पुर्ण करण्यात आले . शासकीय वनविभागाच्या जमीनीवर एकुण 2600 झाडांच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले . तसेच गावच्या विकासासाठी मंजूर असलेली कामे, लक्ष्मी .आई मंदिर ते हनुमान महाराज मंदिर व मंदिर परिसर सिमेंट रस्ता काम , हनुमान महाराज मंदिर परिसरात सभागृह , आनंदवाडी वस्ती येथे आंगणवाडी रुम इत्यादी विकास कामे लवकरच मार्गी लागणार असून साबला गावचे सरपंच सौ. जनाबाई काकडे व जेष्ठ समाजसेवक श्री नरहरी काकडे सर यांनी साबला गावाला व संपूर्ण जिल्हयाला दाखवून दिले आहे कि गावचा विकास काय असतो.केज पंचायत समिती, उमरी गणातील प्रबळ दावेदार म्हणून आज या समाज सेवकाकडे जनता पहात आहे.जनतेची सेवा करण्याची आवड असणारा ध्येयवेडा, समाज सेवेचे अनेक राज्य स्तरीय पुरस्कार विजेता, निस्वार्थी आदर्श समाज सेवक आज केज पंचायत समिति च्या उमरी गणातून निवडणूकीच्या रिंगणात उतरत असून जनता नक्कीच अशा समाज सेवकास आपला आशिर्वाद देणार यात तिळमात्र शंका नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!