दनका/इफेक्ट केजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाले उपअभियंता/जनक्रांती न्युज बातमीमुळे नवीन अधिऱ्यांची नियुक्ती करण्यात आली!
केज/प्रतिनिधी
केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता साहेब आहेत तरी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे कारण जेव्हा कार्यालयात कोणी जाते तेव्हा ते हजर नसतात त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत एखाद्या छोट्या मोठ्या कामाच्या निमित्ताने कोणी गेले तर केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता साहेब यांची भेट होत नाही किंवा त्यांना फोन केला तर त्यांचा फोन लागत नाही तरी तालुक्यातील एवढ्या मोठ्या खुर्च्यिवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांना कामाची जबाबदारी म्हणजे काय आहे हे माहीत नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच त्यांना कार्यालयाची वेळ कळते की नाही असा सुध्दा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण कधी असतात तर बेपत्ता असतात तसे तर त्यांना आठ -आठ दिवस कार्यालयाचा रस्ता सुद्धा सापडत नाही त्यामुळे केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे अशी बातमी दोन तीन दिवसा पूर्वी जनक्रांती न्यूजने प्रकाशित करण्यात केली होती व आज केज सार्वजनिक बांधकाम विभागाला उपविभागीय अभियंता म्हणून घोळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





















