Homeताज्या बातम्याकेजच्या गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकरला तात्काळ अटक करा - केविसंस

केजच्या गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकरला तात्काळ अटक करा – केविसंस

केजच्या गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकरला तात्काळ अटक करा – केविसंस

केज/प्रतिनिधी

केज – केजच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्यावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला असून आरोपी लक्ष्मण बेडसकरला तत्काळ अटक करा तसेच या घटनेत लोक घटनास्थळी कांहीं मिनिटात पोहोंचले तसेच त्यांनी घटनास्थळाचे व्हिडिओ काढलेले आहेत आणि आरोपी बेडसकरच्या गाडीतील मोबाईल काढून घेतला आहे. यामुळे या प्रकरणात लक्ष्मण बेडसकर तर दोषी आहेच परंतु निर्जन ठिकाणी पोहोंचेपर्यंत सोबतच्या लोकांनी आरडाओरड का केली नाही अशा शंका उत्पन्न होत असल्याने सोबत असणाऱ्या व पाठलाग करत लगेच मागे पोहोंचलेल्या लोकांचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी केज विकास संघर्ष समितीने केली असून आरोपीला तात्काळ अटक करून पीडितेला न्याय न मिळाल्यास जनतेच्या सहभागाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे.केज येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने केज पोलिसांकडे केली आहे. मात्र आज तिसऱ्या दिवशीही आरोपी लक्ष्मण बेडसकर फरार आहे. बेडसकर यांच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंग पाहता हा व्यक्ती महिला व मुलींच्या सतत संपर्कात असल्याचे जाणवते. याच त्याच्या वृत्तीचा अंदाज घेऊन कांही लोकांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्याला जाळ्यात ओढले आहे. मात्र याच वेळी अशा जाळ्यात अडकण्यासाठी बेडसकर कांहीं लहान बालक नाही. त्यामुळे प्राप्त माहितीवरून या प्रकरणात समाज व कायद्याच्या नजरेत निर्दोष दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणाचा फायदा घेऊन या घटनेला घडवण्यासाठी कांहीं लोकांची टोळी मदत व काम करत असण्याची शक्यताही बोलली जाते.त्यामुळे केज पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला व या घटनेत प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभागी लोकांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी आणि या घटनेतील पूर्ण सत्य बाहेर आणावे अशी मागणीही समितीने केज पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. कांहीं लोक आपल्या फायद्यासाठी अशा घटना पूर्वनियोजित पद्धतीने घडवून केज व परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण बनवत असतील तर त्यांचा बंदोबस्त होणेही गरजेची आहे असेही निवेदनात म्हटले आहे.आरोपीला व प्रकरणात सहभागी लोकांना तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!