मांजरा नदीला महापुर /नदीपात्राने नदीपात्र ओलांडत, दैठणा, राजेगाव, पिट्टी ,बोरगाव, गावात शिरकाव!
केज /प्रतिनिधी काशीनाथ कातमांडे
केज तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असतानी केज तालुक्यातील मांजरा नदीला महापुर आल्याने नदीपात्राने नदी पात्र सोडुन दैठणा, राजेगाव, पिट्टी ,बोरगाव, गावात शिरकाव केला त्यामुळे गावातील नदीकाठच्या शेतकरयाचे शेतीचे प्रचंड नुकसाण झालेले आहे. तसेच दैठणा या गावातील शेतकरी श्री महेश मुळे याचा गायगोठा पुराच्या पाण्यात गेल्याने त्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. गायगोठ्यात त्याचे नउ दहा जनावरे पाण्यात होते ते सुखरुप बाहेर काढले परंतु कडबाकुटी, सरकी पेड ,सुग्रास ,शेतीच्या अवजारांचे नुकसान झाले आहे .श्री रामेश्वर मुळे याचा ही गायगोठा पाण्यात जाउन त्याच ही खुप नुकसान झालेल आहे .तसेच श्री उतरेश्वर कातमांडे याच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्याचही खुप नुकसान झालेल आहे त्यामध्ये घरातील गहु ज्वारीच नुकसान झालेल आहे.





















