केज तालुक्यातील साबला येथे जलपूजन कार्यक्रम संपन्न !
केज / प्रतिनिधी
केज तालुक्यातील साबला येथील सरपंच जनाबाई नरहरी काकडे , एआरटी संस्था , यवतमाळ .अँक्सिस बँक यांच्या वतीने जलपूजन कार्यक्रम संपन्न सरपंच जनाबाई नरहरी काकडे व समस्त साबला येथील नारिकांच्या विनंतीला मान देऊन एआरटी संस्था , यवतमाळ . संस्थापक / अध्यक्ष सुहास धस , मन्सुर खोरासी , जलसंधारण तज्ञ पवन नखाते , प्रकल्प व्यवस्थापक वली तांबोळी , प्रकल्प सहाय्यक ज्योती सांबरे , दहिरे सर , पोकलेन ऑपरेटर सोनुकुमार चंद्रवंशी , दिलीपकुमार चंद्रवंशी तसेच अँक्सिस बँक प्रतिनिधी यांचया वतीने साबला येथील नदी पात्राचे दोन हजार मीटर खोलीकरण व रुंदीकरण करुन त्यामध्ये वीस मीटर अंतराचे बॉक्स म्हणजे शोष खड्डे करुन त्यामध्ये प्रत्येक खड्यात वीस फूट खोल बोरवेल घेण्यात आले आहेत .त्यामध्ये पावसाचे पडलेले पाणी दुसरीकडे इतर ठिकाणी वाहून न जाता त्याच ठिकाणी जमिनीमध्ये मुरले पाहिजे अशा प्रकारचे काम करण्यात आले आहे . तसेच या वर्षी मे महिण्यात अवकाळी पाऊस पडला आणि साबला शिवारातील व परिसरातील बोरवेल तसेच विहिरींनाही याचा चांगला फायदा झाला . जवळ पास एक ते दिड किलो मीटर अंतरावरील बोरवेल व विहिरींना याचा फायदा झाला . या अगोदरच्या काळात म्हणजे अंदाजे वीस वर्षा पासून साबला या गावातील नागरिकांना पाण्याची भिषण टंचाई जाणवत होता साबला येथील सरपंच जनाबाई नरहरी काकडे व साबला येथील सर्व नागरिकांच्या विनंतीला मान देऊन एआरटी संस्था , यवतमाळ . व ॲक्सिस बँक यांच्या माध्यमातुन साबला येथील नारिकांचा , पशु पक्षी यांच्या पिण्याच्या पाण्याचा भेडसावणारा प्रश्न कमी प्रमाणात झाला आहे . यावर्षी पाऊसही चांगल्याप्रकारे पडला आहे . साबला शिवरात पडलेल्या पावसाचे पाणी हे साबला शिवारात आडवल्यामुळे साबला येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही . यामुळे साबला गावातील सर्व नागरिक आनंदी झालेले आहेत सरपंच जनाबाई नरहरी काकडे , एआरटी संस्था , यवतमाळ . व अँक्सिस बँक प्रतिनिधी , ग्रामपंचायत अधिकारी तानाजी शिंपले यांचे सर्व गावकरी यांनी आभार मानले.यावेळी माजी सरपंच मधुकर काकडे , चेरमन उत्तम काकडे , ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , रामराजे शिंदे , दशरथ कटारे , माजी पोलिस उपनिरीक्षक उमाशंकर शिंदे , मुख्याध्यापक हनुमंत कटारे , जगन्नाथ काकडे , लक्ष्मण महराज काकडे , गणेश कटारे , रंगनाथ नाईकनवरे , उध्दव नाईकनवरे , बाबुराव कटारे , गुलाब मुळे , माऊली नाईकनवरे , राहुल मुळे , लखन राऊत , अंकुश मुळे , भैरू नखाते , सुर्यभान सरवदे , अशोक रोकडे , संदिपान सरवदे इत्यादिंच्या मान्यवरांच्या उपस्थितीत जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला .





















