केज तहसीलदार साहेब नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज मंदिर रोडचे काम ठप्प कशामुळे? उर्वरित अतिक्रमण कधी हटणार?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज रोडचे काम ठप्प झाले आहे याचे कारण काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे केज तहसीलदार साहेब यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेले काम आज ठप्प झाले आहे याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच केज तहसीलदार यांनी उर्वरित अतिक्रमण पावसाळा संपल्यानंतर काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते परंतु आणखी सुध्दा उर्वरित अतिक्रमण काढले जात नाही याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी केज तहसीलदार चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज मंदिर ते नागबेट वस्ती रोडचे काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला तहसीलदार साहेब यांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण चिंचोली माळी येथील नागबेट वस्ती ते श्री संत नामदेव महाराज मंदिर रोडचे काम अतिक्रमण तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे ठप्प झाले आहे की केले आहे याची खात्री करून काम तातडीने पूर्ण करण्यात यावे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















