Homeताज्या बातम्याआंगनवाडी सेविका, आशा व मध्यान भोजन बनवणारांच्या हक्कांसाठी भारतीय जनता मजदुर संघाच्या...

आंगनवाडी सेविका, आशा व मध्यान भोजन बनवणारांच्या हक्कांसाठी भारतीय जनता मजदुर संघाच्या वतीने निवेदन !

आंगनवाडी सेविका, आशा व मध्यान भोजन बनवणारांच्या हक्कांसाठी भारतीय जनता मजदुर संघाच्या वतीने निवेदन !

केज/प्रतिनिधी

देशातील आंगनवाडी सेविकांना श्रमिक म्हणून वैधानिक मान्यता,किमान वेतन,सामाजिक सुरक्षा व पेन्शन यांसारखे मूलभूत हक्क मिळावेत,यामागणी साठी दि.३१ डिसेंबर २०२५ पासून भारतीय जनता मजदूर संघ यांच्या वतीने राष्ट्रव्यापी पत्र व ज्ञापन आंदोलन आयोजित आले.यावेळी केज तहसीलदार राकेश गिड्डे यांना निवेदन दिले. हा उपक्रम औपचारिक किंवा प्रतीकात्मक नसून, संविधानिक अधिकार आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणी साठीचा गंभीर लोकशाही प्रयत्न असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.देशभरातील सुमारे २७ लाख आंगनवाडी सेविका गेल्या अनेक दशकांपासून माता बालक पोषण,सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक कल्याणाची जबाबदारी सातत्याने पार पाडत आहेत.मात्रआजही त्यांना श्रमिक दर्जा,किमान वेतन तसेच सामाजिक सुरक्षे पासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाने दीर्घकाळ नियमित व नियंत्रित स्वरूपाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ मानधनधारक स्वयंसेवक न मानता श्रमिक म्हणून मान्यता देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असताना ही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघटनेने या प्रश्नांच्या निराकरणाची अपेक्षा सध्याच्या सरकारकडूनच असून,संघर्षाची भूमिका न घेता संविधानिक व संवाद आधारित मार्गाने हे ज्ञापनपत्र आंदोलन राबविण्यात येत आहे.या आंदोलनाअंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालय, श्रम व रोजगार मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच माननीय पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले. दबाव निर्माण करणे हा उद्देश नसून,धोरण,कायदा आणि प्रत्यक्ष परिस्थिती तील तफावत अधोरेखित करून सर्वोच्च न्यायालया च्या निर्देशांनुसार श्रम- सन्मान सुनिश्चित करण्या साठी सकारात्मक पावले उचलली जावीत,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान, देशातील बौद्धिक वर्ग, शिक्षणतज्ज्ञ,धोरण विशेष तज्ञ आणि विचारवंत नागरिकांनी याविषयाकडे भावनिक नव्हे तर कायदेशीर,संविधानिक व नीतिगत दृष्टिकोनातून पाहून न्याय्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. केज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी निवेदन देण्यासाठी उपस्थित होत्या भारतीय जनता मजदुर संघाचे महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी,मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील, रामदास तपसे,शेषेराव कसबे यांच्यासह संगीता देशपांडे,मीरा नेहरकर , अंजली खोत,रोहिणी रुईकर,कमल सत्वधर, कमल लांडगे,शाहीन शेख,सुनीता भालेकर, समीक्षा घोडके आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!