अखेर कोल्हापूराचा विजय झाला/महादेवी हत्तींनीला परत देण्यासाठी वनतारा प्रशासन तयार!
कोल्हापूर /प्रतिनिधी
तळहाताच्या फोडाप्रमाणं गेली 33 वर्ष सांभाळलेल्या आणि कोल्हापुरातील नांदणीकारांसह सीमाभागातील भाविकांच्या काळजाचा तुकडा असलेल्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गावकऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री निरोप दिला होता दाटून आलेले हुंदके, जड अंतकरणानं देत असलेला कायमचा निरोप, लाडकी महादेवी पुन्हा कधी दिसणार नाही, या एकाच भावनेनं आबालवृद्ध धायमोकलून रडू लागले. यामुळं परिसरातील वातावरण भावनिक बनलं. जमलेल्या श्रावक-श्रावकांनी हत्तीणीला आमच्यापासून दूर नेऊ नका, अशी साद घातली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयापुढं कोणाचंही चालेना. मुक्या प्राण्याप्रति व्यक्त झालेल्या संवेदनांमुळं महादेवी हत्तीणीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागल्याची चर्चा होती. दगडालाही पाझर फुटावा अशी परिस्थिती होती. मात्र सगळेच न्यायालयानं दिलेल्या निकामुळे हतबल झालं. अखेर नांदणीसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना जड अंतःकरणानं लाडक्या महादेवीला ‘अलविदा’ केला तसेच अंबानींच्या सगळ्या प्रोडक्ट वर बहीष्कार गावकऱ्यांनी टाकला आहे होता कोल्हापूर करांनाचा लढा सुरूच होता व काल जनभावना लक्षात घेता वनतारा प्रशासन महादेव हत्तीनीला परत देण्यासाठी तयार झाले व कोल्हापूरकराचा विजय झाला आहे.





















