येडेश्वरी कारखान्याने करुन दाखवले पन गंगामाऊलीने का नाही केले,शेतकऱ्यांना पडला प्रश्न?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला तीन हजार रुपये टन पहिल्या हप्त्याची उचल काढण्यासाठी मागिल काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केले परंतु अनेक कारखानदारांनी २८०० रूपये उचल दिली तसेच केज तालुक्यातील सख्या भावा प्रमाणे असणारे कारखाने म्हणजे येडेश्वरी व गंगामाऊली कारखाने आहेत परंतु शेतकऱ्यांना पहीली उचल देताना सख्या भावा मध्ये म्हणजे गंगामाऊली व येडेश्वरी कारखान्यात फरक पडला आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की येडेश्वरी कारखान्याने शेतकऱ्यांना पहीला हप्ता २८०० रुपये दीला परंतु गंगामाऊली कारखान्याने पहीला हप्ता शेतकऱ्यांना २७०० रूपये दीला आहे त्यामुळे गंगामाऊली कारखान्याला ऊस देणारे शेतकरी नाराज झाले आहेत तरी गंगामाऊली कारखान्याने पन पहिला हप्ता शेतकऱ्यांना २८०० रुपये द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांन कडून व्यक्त करण्यात येत आहे तरी गंगामाऊली कारखाना शेतकऱ्यांना पहीला हप्ता २८००रुपये देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांन कडून व्यक्त केला जात आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















