बीडीओ साहेब चिंचोली माळी उपसरपंच चौकशी पासून वाचवताय का? तक्रार देऊन आठ दिवस झाले कार्यवाही का नाही?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे चिंचोली माळी सारुकवाडी येथील उपसरपंच सौ. गीता धीरज वनवे यांनी जलजिवन मिशन पाणी पुरवठा योजनेची विहीर व पाइपलाइन स्वताची व नातेवाईकाची जमीन भिजवण्यास पाणी वापत असुन चिंचोली माळी सारुकवाडी उपसरपंच तुपाशी, गावकरी मात्र उपाशी असल्याची माहिती समोर आली असून अशा उपसरपंचावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जातुन करण्यात आली आहे.या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी ता. केज अंतर्गत सारुकवाडी गाव आहे. सदर गावास पाणी पुरवठा करण्यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत एम.आर.ई.जि.एस.च्या माध्यमातून नदीकाठी बुडीत क्षेत्रात विहीर खोदलेली आहे. त्या विहरीवरुन गीता धीरज वनवे व त्यांचे नातेवाईक जलजिवन मिशन अंतर्गत केलेल्या पाईपलाईन व्दारे त्यांच्या शेतासाठी पाणी वापरीत असुन गावातील नागरिक पाण्यासाठी ग्रामपंचायत कडे वारंवार निवेदने देत आहेत. तसेच गावातील कोणी या विहरीची विचारणा करण्यासाठी गेले असता ते स्वतः सरपंच असल्याचा अधिकार सांगत आहे. तरी ती विहीर सन 2019-2020 मध्ये झालेली असुन तेंव्हापासुन या विहरीवर त्यांनी अतीक्रमण केलेले आहे. तरी में. साहेबांनी सदरील व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करुन विहीर गावक-यांसाठी खुली करुन देण्यात यावी अशी मागणी तक्रार अर्जातुन करण्यात आली आहे . गटविकास अधिकारी साहेब ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीवर उपसरपंचावर कार्यवाही करुन, गावकऱ्यांना न्याय देणार का ?/गावकरी उपाशीच ठेवणार?





















