चिंचोली माळी येथे होणार चंपाषष्ठी खंडोबा यात्रा, वाघ्या मुरळी कार्यक्रम व नगर तोडण्याचा कार्यक्रमाचे आयोजन!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे चंपाषष्ठी खंडोबा यात्रे निमित्त प्रथमच नगर तोडण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की चंपाषष्ठी खंडोबा यात्रेचे निमित्ताने केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे २४/११/२०२५ रोजी सोमवारी सायंकाळी ठीक ९ वाजता वाघ्या मुरळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच बुधवार दिनांक २६/११/२०२५ रोजी दुपारी १२ वाजता नगर तोडण्याचा कार्यक्रम होईल तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी चिंचोली माळी येथे होणाऱ्या चंपाषष्ठी खंडोबा यात्रेचा मनोभावे लाभ असे आवाहन समस्त ग्रामस्थ चिंचोली माळी येथील नागरिकांनी केले आहे.





















