Homeताज्या बातम्यादोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या,नाहीतर त्याचा एन्काऊंटर करा-...

दोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या,नाहीतर त्याचा एन्काऊंटर करा- मनोज जरांगे पाटील

बीड/प्रतिनिधी

मालेगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मालेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून, दगडाने तिचं डोकं ठेचून हत्या करण्यात आली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, संताप व्यक्त करण्यात येत आहे, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी पीडितेच्या वडिलांनी आपली व्यथा मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना आता मनोज जरागे पाटील यांनी, मोठी मागणी केली आहे. मुख्यमंत्री, महोदय दोन महिन्याच्या आत कायदा करा आणि आरोपीला फाशी द्या, नाहीतर त्याचा एन्काऊंटर करा मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री, महोदय दोन महिन्याच्या आत कायदा करा, आणि आरोपीला फाशी द्या, नाहीतर त्याचा एन्काऊंटर करा. लाडकी लेक म्हणतात, लाडकी बहीण म्हणतात तर त्यांना न्याय द्या. न्याय देता येत नसेल तर तुमचे तोंड काळे करा. दोन महिन्याच्या आत न्याय न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कायद्यात बदल करा, काहीही करा, पण न्याय द्या. येत्या मंगळवारी कॅबिनेट बैठकीमध्ये कायद्यात दुरुस्ती करा, बाल लैंगिक सुधारणा कायद्यात दुरुस्ती करा, पीडितेच्या नावाने कायदा करा. या प्रकरणात उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करा, अशी मोठी मागणी या प्रकरणात जरांगे पाटील यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!