“इफेक्ट”वनविभागाने घेतली जनक्रांती न्यूजच्या बातमीची दखल/परीसरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी/बीबट्या,वाघ, किंवा तडस असल्याचा वनविभागाचा अंदाज!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील केवड शिवारात चौसाळा रोडला शिक्षक गोविंद सपाटे यांच्या शेतात वाघाचे दिसल्याची माहिती शिक्षक गोविंद सपाटे यांनी काल रात्री दिली होती तसेच आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की केवड येथे चौसाळा रोड म्हसोबा मंदिराच्या वरील बाजूस गोविंद सपाटे यांच्या शेतात अंदाजे तीन ते चार फुट उंची एवढा वाघ दिसला असून सायंकाळी सहा वाजून 55 मिनिटांनी प्रत्यक्ष शेतात दिसला आहे अशी बातमी जनक्रांती न्यूजने शेतकरी, शिक्षक गोविंद सपाटे यांच्या मते प्रकाशित केली होती बातमीची दखल घेत वनविभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने कारवाई सुरू केली असून आज गोविंद सपाटे यांच्या शेतात भेट दिली व तेथील पंजांचे ठसे घेतले असून चाचपणी करुन उद्या कोणता प्राणी आहे यांची सखोल माहिती काढून उद्या माहिती देऊ असे वनविभाग अधिकारी यांनी म्हटले आहे तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजे माहिती नुसार बिबट्या,तडस, किंवा वाघ असावा असे त्यांनी म्हटले आहे तरी आजुबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांनी सावधानता बाळगणे आपले जनावरे पशु प्राणी सुरक्षित ठिकाणी आहेत का याची काळजी घेणे गरजेचे आहे यावेळी उपस्थित शेतकरी गोविंद सपाटे, वनविभाग अधिकारी, कर्मचारी,व गावातील नागरिक उपस्थित होते.





















