केज तहसीलदार साहेब केवड येथे दिसलेला बिबट्या शिरपुरा येथे आढळला?/परीसरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी/ तहसीलदार साहेब लोक मारल्यावर तुम्हाला जाग येणार का?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील केवड शिवारात चौसाळा रोडला शिक्षक गोविंद सपाटे यांच्या शेतात मागिल दोन दिवसा पूर्वी दिसल्याची माहिती शिक्षक गोविंद सपाटे यांनी दिली असुन आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे व तोच बिबट्या शिरपुरा येथे आढळला आहे तरी या विषयी सविस्तर वृत्त असे की केवड येथे आढळून आलेला बिबट्या शिरपुरा येथे दोन महीलांना दिसुन आला आहे तरी बिबट्या अंदाजे तीन ते चार फुट उंची एवढा आहे तरी आजुबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांनी सावधानता बाळगणे आपले जनावरे पशु प्राणी सुरक्षित ठिकाणी आहेत का याची चाचपणी करणे काळजी घेणे गरजेचे आहे तसेच वनविभाग उद्या त्यांला जेरबंद करण्यासाठी कार्सुयवाही सुरू करणार आहेत परंतु दोन ते तीन दिवसांपासून बातमी पसरत असताना केज तहसीलदार मात्र तालुक्याचे प्रमुख प्रशासन असताना झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण बिबट्या निदर्शनास आला आहे त्यांला दोन चार दिवस झाले आहे परंतु केज तहसीलदार यांच्या कडून कुठल्याही प्रकारची हालचाल केली जात आहे त्यामुळे केज तहसीलदार काय माणस मेल्यावर जाग येणार का असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.





















