धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान बीड जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्व बळावर लढणार : संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव
बीड /प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील यांच्या आदेशानुसार व संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघटना बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही स्व बळावर लढणार असल्याचे अण्णासाहेब जाधव यांनी कळविले आहे तसेच प्राथमिक आज तीन उमेदवार घोषित करण्यात आले आहे त्यात शिरसाळा सर्कल जिल्हा परिषद उमेदवार म्हणून वशिष्ठ भाऊ वानखेडे, पौळपिंपरी पंचायत समिती गणातून बाबा सोनवणे तसेच बर्दापुर पंचायत समिती गणातून मनोज शिंदे हे संघटनेच्या वतीने उमेदवार जाहीर झाले या मुळे मातब्बर नेते मंडळी व राजकीय पक्ष यांची चांगलीच भांबेरी ऊडालेली आहे कारण आज प्रत्येक गावात शिवस्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, अण्णासाहेब साठे यांचे स्मारक उभारले असल्याने व राजकीय लोकांना जे जमले नाही ते बाळराजे दादा आवारे पाटील यांनी केल्याने धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे मावळे प्रत्येक गाव खेड्यात तयार झाले आहे





















