जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गल्लीबोळातले भुरटे पुढारी झाले जागे ?
केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. गट, गणाचे आरक्षण जाहीर झाले आणि हवसे, नवसे, गवसे कामाला लागले आहेत. गेल्या ८ वर्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होत आहे. या काळात जनतेने काय सहन केले हे भुरटे पुढारी विसलेत वाटतं. आता ज्याच्या तोंडाकडे कधी बघत नव्हते त्याला फोन करून म्हणतात, काय चाललंय, कुठे आहात. काय काम आसल तर सांगा, मी बोलतो नेत्यांना, सगळ ठिक आहे ना…..! काय बी आडचण आसु द्या, अर्ध्या रात्री फोन करून सांगा, दोन मिनीटात काम करुन घेऊ, असे फोन, मेसेज करुन विचारपुस करत आहेत.गेल्या काही दिवसांपासून घरकुल बावीस हजार, विहीर कुशल बील काढण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांकडून वीस हजार रुपये घेताना यांचे हात थरथरले का नाहीत? हेच का तुमचे पुतना मावशीचे वरवरचे बेगडी प्रेम ? पण आता गोरगरीब जनता हुशार झाली आहे, ज्या घरकुलासाठी, विहीरीसाठी जी रक्कम घेतली त्यांच्या डब्बल वसूल केल्याशिवाय जनता राहणार नाही. अशा चिंदीचोर पुढान्यांना हिसका दाखवल्याशिवाय जनता स्वस्त बसणार नाही. असाच पुळका जर पडत्या काळात दाखवला असता तर आज जनतेला तुम्हाला हात जोडून, बधा तेवढ लक्ष ठेवा आपलीच माणसं आपण मोठी करायला पाहिजे, हे बोलण्याची वेळ आली नसती. याच गोरगरीबांच्या जिवावर पाच वर्ष तुम्ही सत्ता भोगता आणि याच गोरगरीबांना एखादी योजना आली तर ती फुकट होत नाही. व्वा रे लोक प्रतिनिधी, कोणाचा विजय आणि कोणाचा पराजय करायचा हे सर्वसामान्य जनताच ठरवणार, अशी जोरदार चर्चा चावडीवर, वटयावर बसून नागरीक करत आहेत. एक दिवस थोर्ड आमिष दाखवता व नंतर पाच वर्ष जवळचा, लांबचा विसरता. खरोखर हीच का ती पवित्र लोकशाही? अरे लाजा बाटू द्या, आपण बोलतो काय आणि बागतो काय? हे तुम्हाला तरी पटते का? असो, परंतु कोण किती पाण्यात आहे हे मतदारांना सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. आपण फक्त आपले डिपॉझीट जप्त होवू नये याची काळजी घ्या, जेवढे जनतेला आपण वेक्यात काढले आहे त्याच्या दुप्पट परतफेड करावी लागणार आहे. निवडणुकीचे घोडे मैदान, महाभारत लांब नाही, आपणही पहाणारच आहात. परंतू आपापल्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरून आपण किती जनतेला वेड्यात काढलंय याचा मनोमन विचार करा, ही लोकशाही आहे. जनतेने जर विचार केला तर आपले डिपॉझीट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे तेव्हा कळते जेव्हा निकाल हाती येतो, तोपर्यंत आपण पैशाच्या, सत्तेच्या आणि अभिमानाच्या थाटात असता. वेळ आल्यावर सर्वसामान्य जनता आपणास योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे सर्वसामान्य नागरीतून बोलले जात आहे.





















