आर एम बी के एस संघटनेच्या सातव्या राज्य अधिवेशनास हजारोच्या संख्येने उपस्थित रहा-प्राध्यापक डॉक्टर मोहन मिसाळ
अंबाजोगाई/ प्रतिनिधी
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचाऱ्यांचे पुणे येथे दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सातवे महाराष्ट्र राज्य अधिवेशन 2025 संपन्न होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार विक्रम काळे यांचे हस्ते होणार आहे तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्रांताध्यक्ष प्रेमराज बोबडे माननीय किरणराव सरनाईक शिक्षक आमदार डॉक्टर संजय धाबळे प्रदेशाध्यक्ष प्रोटॉन डॉक्टर सिद्धार्थ कांबळे हे असणार आहेत या या अधिवेशनाची अध्यक्षता राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघ नवी दिल्ली हे करणार आहेत या अधिवेशनामध्ये 15 मार्च 2024 ची संघ मान्यता अंशतः अनुदानातील शाळेतील शिक्षक अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती प्रक्रिया तसेच कामगारांचे मूलभूत हक्क याविषयी चर्चा केली जाणार असून या अधिवेशनास हजारोंच्या संख्येने आपण उपस्थित रहावे असे आव्हान डॉक्टर प्राध्यापक मोहन मिसाळ यांनी केले आहे .





















