शिवसेना ठाकरे गट कर्जमाफी न केल्यास तीव्र आंदोलन करणार – गणेश वानकर
सोलापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त व अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी उत्तर सोलापूर चे तहसीलदार निलेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे .सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असून , सोलापूर सह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झालेले आहे असंख्य शेतकऱ्यांची शेतीचं वाहून गेली आहे दोन दोन तीन तीन वेळा पेरलेले पीक संपूर्ण वाया गेलं आहे आणी असं असून सुद्धा शेतकऱ्यांना भरीव मदत न करता फक्त आकड्यांचे खेळ करून गाजर दाखवत आहे .तरी याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा व संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश दादा वानकर यांनी दिला .यावेळी उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे , शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ , समन्वयक वजीर शेख , उपतालुका प्रमुख अच्युतराव बाभळे , महिला संघटिका सौ परिनीता शिंदे , विभाग प्रमुख लक्ष्मण मुळे , उपतालुका प्रमुख सदाशीव सलगर , उपविभाग प्रमुख अरुण लोंढे , माजी सरपंच राजु घाटे , उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप , उपविभाग प्रमुख श्रीकांत आदाटे , माजी सरपंच विष्णु भोसले , बाबा लोंढे , विजय बादगुडे , शाखाप्रमुख सोमनाथ मोहोळकर , विजयसिंह शिंदे यांच्यासह अनेक गावोगाव चे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी व शेतामजूर उपस्थित होते.





















