चिंचोली माळी पशुवैद्यकीय दवाखान्याला कुणी वाली आहे का ?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला कुणी वाली आहे का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण चिंचोली माळी पशुवैद्यकीय दवाखाना असुन खोळंबा नसुन वळींबा असे असल्या सारखे झाले आहे कारण पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय डॉक्टर हजर नसतात त्यामुळे चिंचोली माळी येथील पशुपालक यांची खुप मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे कारण चिंचोली माळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर नसतात तसेच दवाखाना कार्यालयीन वेळेत बंद असतो तर कधी सुरुच नसतो त्यामुळे पशुपालकांची प्रवेट डाॅक्टर मोठ्या प्रमाणात लुट करत आहेत तरी चिंचोली माळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर यांना समज घालने गरजेचे आहे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे .





















