बीड जिल्ह्यात सायबर पोलिस प्रशासनाने फेसबुक, इंस्टाग्रामवर फेक अकाउंट काढुन अनेकांची अब्रू काढणाऱ्यावर कार्यवाही करावी नागरिकांन मध्ये चर्चा!
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात सोशल मीडिया एखाद्याची अब्रू काढण्यासाठीचे साधन झाले आहे जसे की फेसबुक , इंस्टाग्राम असे सोशल नेटवर्क एखाद्या प्रतिष्ठीत नागरिकांची अब्रु काढण्यासाठीचे साधन बनले आहे तसेच त्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्रामवर फेक अकाउंट काढुन अनेकांची फसवणूक सुध्दा केली जाते आहे त्यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच छोट्या मोठ्या गोष्टींवर एखाद्या व्यक्तीला बदनाम करणे असे सोशल मीडिया वर फेक अकाउंट काढुन बदनामी केली जात आहे तसेच यामध्ये महीलेच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट तयार करून अनेकाची अब्रू काढली जात आहे तसेच अनेकांना बदनाम केले जाते आहे अशा सोशल मीडिया बाजार भुंग्या वर सायबर क्राईम पोलिस यांनी कार्यवाही केली पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















