तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत शिराढोण येथील प्राध्यापक शिरमाळे सर यांच्या चिरंजीव जीशान 100 मीटर मैदानी धावणे या तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटविला !
कळंब प्रतिनिधी /तोफिक मोमीन
कळंब तालुक्यातील शिराढोण शरदचंद्र महाविद्यालय येथील भूगोल विभागाचे प्रा. डॉ.शिरमाळे एम.बी यांचे चिरंजीव मोहम्मद, जीशान शिरमाळे, यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत 100 मीटर धावणे तसेच लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याबद्दल शरदचंद्र महाविद्यालयाच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात आले तसेच त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर प्रा. डॉ. शिरमाळे एम.बी यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा “राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025” साठी निवड झाल्याबद्दल त्यांचे देखील महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजेद चाऊस , महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. व्यंकटराव जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद यांच्या वतीने त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या .





















