नांदुरघाट ग्रामसेवकावर कारवाई का नाही?; कारवाई नाही केली तर आत्मदहन करणार-अमोल जाधव
केज/प्रतिनिधी
नांदूरघाट जिल्हा परिषद शाळा मोडखळीस आली. त्या ठिकाणी चालू विद्यार्थ्यांचे सहा खोल्या पाडून जुन्याच खोल्यावर हॉल करून नादुरुस्त तसेच खिडक्या नाही, गळणारे हॉल करून शाळेचे वाटोळे केले. ग्रामपंचायत परिवर्तन झाल्यावर याची चौकशी लावली. मागील दोन वर्षापासून प्रत्येक २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा दिल्यावर त्यावेळी लेखी स्वरूपात देण्यात आले. परंतु कारवाई करण्यात आली नाही. २६ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा आत्मदहनाचा इशारा दिला. यावेळी वरिष्ठ अधिकारी यांनी मध्यस्थी करून याची चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशी समितीवर कार्यकारी अभियंता तसेच गटविकास अधिकारी अंबाजोगाई ग्रामसेवकावर कारवाई झालेली नाही. म्हणजे या मोठ्या भ्रष्टाचाराच्या रॅकेटमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड हे असल्याचा आता संशय येऊ लागला आहे. आठ दिवसात रिकवरी करून हा भ्रष्टाचार जनतेसमोर सत्यसमोर नाही आणले तर पुढच्या आंदोलनाला किंवा काही बरे वाईट घटना घडली तर त्याला जिम्मेदार हे आता मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग हे राहतील.





















