स्व. सतिश देशमुख यांच्या कुटुंबीयांची डाॅ. अशोक थोरात यांनी घेतली सांत्वनापर भेट!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील वरपगाव येथील मराठा आंदोलनात शहीद झालेले स्व.सतीश देशमुख यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी तालुक्यातील वरपगाव येथे मंगळवारी सायंकाळी मराठ सेवक सतीश ज्ञानोबा देशमुख यांना श्रद्धांजली देण्यासाठी स्व. सतीश देशमुख यांचा मुंबई आंदोलनात सहभागी होऊन जात असताना शिवनेरी मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासादरम्यान रक्तदाब वाढल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले होते. त्यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करून सतीश देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे डॉ.अशोक थोरात यांनी म्हटले कुटुंबीयांना आधार देण्यासाठी सांत्वन पर भेट दिली यावेळी डॉ.अशोक थोरात, डॉ आबासाहेब देशमुख. ॲड माधव जाधव. ॲड बाबुराव देशमुख सरपंच वरपगाव. बंधू व्यंकटेश देशमुख इतर नागरीक उपस्थित होते.





















