मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भिकार चाळे बंद करा /मराठा मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील
मुंबई/प्रतिनिधी
मुंबई येथील आझाद मैदानावर अमरण उपोषणाला संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील बसले आहेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आदेश मराठा समाज बांधवांचे हाल सुरू केले आहेत मुंबई अझाद मैदानावर पथदिवे बंद केले तसेच खाऊचे दुकाने बंद केले, पाऊस येत आहे कुठे निवारा नाही तसेच पाणी पुरवठा बंद केला आहे असे भिकार चाळे मुख्यमंत्री असुन देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केले आहेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असले भिकार चाळे बंद करावे असे संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी म्हटले आहे तसेच संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की मी मेलो तरी चालेल पण आरक्षण घेतल्या शिवाय मुंबई सोडणार नाही तसेच मुंबई येथील काही मराठा बांधवांनी गाव खेड्यापाड्यातुन आलेल्या मराठा बांधवांना होईल त्या पद्धतीने सोय करत आहे व यापुढे ही करावी अशी मागणी संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.





















