साबला ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने ओम नाईकनवरे यांचा सत्कार सोहळा संपन्न !
केज – प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे साबला येथील ओम अभिमान नाईकनवरे यांची जिल्हा परिषद बीड . आरोग्य सेवक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत कार्यालय , साबला तसेच साबला नगरीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने ओम अभिमान नाईकनवरे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जनाबाई नरहरी काकडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे , माजी सरपंच मधुकरराव काकडे , माननीय लहूराव राऊत – महिला व बालविकास संरक्षण अधिकारी , श्रीमती चंद्रभागा अभिमान नाईकनवरे – अंगणवाडी सुपरवायझर यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या .सत्कार समारंभ प्रसंगी ओम नाईकनवरे यांनी आपल्या मनोगतातून प्रथम सर्व उपस्थितांचे आभार मानले . आणि या माझ्या यशात प्रथम माझे आईवडील , तसेच माझी मोठी बहिण चंद्रभागा राऊत व मेहुणे लहूराव राऊत तसेच माझे सर्व कुटुंबीय सुध्दा आहेत . सत्कार प्रसंगी भावुक होऊन ओम नाईकनवरे यांनी असे म्हटले . की पुढील सेवेच्या कार्यकालात सर्वांची सेवा ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत . असं समजून त्यांची सेवा करण्याची अशी ग्वाही त्यांनी दिली .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच जनाबाई काकडे यांनी असे म्हटले की ओम नाईकनवरे यांची परिस्थिती ही सर्वसाधारण कुटुंबातील असून आई आणि वडिल हे शेतात काबाड कष्ट करतात . शेतीही जास्त नाही . शेतीतील उत्पन्न ही पावसावर अवलंबून आहे . मग आपण अभ्यास नाही केला तर आपले काय होईल . याचा विचार करून ओम नाईकनवरे यांनी चांगले यश मिळविले याबद्दल सरपंच जनाबाई काकडे यांनी ओम नाईकनवरे यांचे अभिनंदन केले . व पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या .माजी सरपंच मधुकरराव काकडे , उमाशंकरराव शिंदे – माजी पोलिस उपनिरीक्षक,आदर्श शिक्षक विक्रमराव नाकईनवरे , लहूराव राऊत ,चंद्रभागा राऊत यांनीही ओम नाईकनवरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी साबला नगरीतील सर्व लहान थोर वडिल धारी मंडळी उपस्थित होती .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सुधीर नाईकनवरे यांनी केले . तर आभार प्रदर्शन माजी उपसरपंच अभिमान नाईकनवरे यांनी मानले .





















