धाराशिव पोलीस बांधवाना लाडक्या बहिणीकडून राखी!
धाराशिव/प्रतिनिधी
धाराशिव :- पोलीस अधिक्षक कार्यालय धाराशिव येथे भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना कोणताही सण साजरा करता येत नाही. घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे, जिव्हाळयाचे नाते निर्माण व्हावे या उद्देशाने आपल्या पोलीस दादांना राखी बांधून त्यांच्या जीवनात आजच्या दिवशी असलेल्या बहिणीच्या प्रेमाची जागा भरून काढण्यासाठी महिलांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली यावेळी पोलीस बांधवानीही बहिणींचे आभार मानले. या भावपूर्ण वातावरणाने पोलीस ठाण्यात एक कौटुंबिक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यावेळी जि.प. माजी सदस्य अंजलीताई बेताळे मॅडम, भाजपा कार्यकारणी सदस्य मनिषाताई केंद्रे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष उषा सर्जे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य विद्या माने,अल्का गौरकार, अनिता तौडकर,शशिकला मुंडे,कदमताई,सलमा पठाण, भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे व पोलीस बांधवासह महिला उपस्थित होत्या.





















