उत्कृष्ठ कार्याबद्दल जिल्हाधिकारी पुजार यांचा सत्कार!
धाराशिव/प्रतिनिधी
धाराशिव : धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा प्रशासन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व गुणवत्तेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्राँझ पदक देऊन गौरव करण्यात आला. या गौरवामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा सन्मान उंचावला असून, जिल्ह्याच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. याबद्दल भाजपा तालुका चिटणीस सचिन लोमटे, दिव्यांग आघाडी तालुका संयोजक,विठ्ठल गायकवाड, युवक प्रशांत जमादार,जि.प. माजी सदस्य,अंजलीताई बेताळे मॅडम ,अल्काताई गौरकार, सरचिटणीस भाजपा युवा मोर्च्या शिवानीताई परदेशी यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई येथील राजभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी महसूल मंत्री चं-द्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुजार यांनी धाराशिव जिल्ह्यातील प्रशासन, लोकसहभाग,जलसंधारण, डिजिटायझेशन आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांना आणि कार्यक्षमतेला मिळालेला हा पुरस्कार जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरला आहे. या यशाबद्दल जिल्ह्यात सर्व स्तरातून कीर्ती किरण पुजार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी दिलेल्या प्रेरणादायी सेवेमुळे प्रशासन यंत्रणेत सकारात्मक ऊर्जा संचारली आहे.





















