साठे जयंती व टिळकांची पुण्यतिथी निमित्त संत बोधले महाराज प्रा.शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!
जनक्रांती न्युज/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी रामराजे जगताप
धाराशिव:- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर डिकसळ येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वप्न स्फूर्ती कन्स्ट्रक्शन चे अध्यक्ष विठ्ठल माने,संगीता थोरात जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी,मकरंद पाटील भाजप शहराध्यक्ष,दत्ता पोळ,जनक जाधव ग्रामपंचायत सदस्य,आनंद बोराडे तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी,रावण वाघमारे,राधाबाई सावंत सरचिटणीस तालुका भाजप, ह.भ.प परमेश्वर महाराज बोधले, महादेव ग्यांनबा वाघमारे,अंकुश वाघमारे ग्रामपंचायत सदस्य,रियाज पठाण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना ओम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे वही,पेन,केळी,बिस्कीट इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले विठ्ठल माने म्हणाले की अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचे विचार आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे व शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी शाळेचे मुख्याध्यापक निकम पोपट, सहशिक्षक रमेश आंबिरकर,प्रदीप यादव,सुरज राऊत,सज्जन बर्डे, किशोर वाघमारे,नामदेव झाडे इत्यादी उपस्थित होते.





















