केज तहसीलदार साहेब केज मधील “आपले सरकार” केंद्र तपासा,काही सीएससी केंद्र बोगस?
केज/प्रतिनिधी
केज व अंबाजोगाई परिसरातील ‘आपले सरकार’ केंद्रांमध्ये अव्वाच्या सव्वा शुल्क घेऊन होत असलेली लूट आता चव्हाट्यावर येताना दीसत आहे. जनतेच्या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने पाच केंद्रांवर थेट छापा मागिल काही दिवसांपूर्वी टाकला आहे.अनेक केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.असा दणका केजमध्ये देखील हवा सरकारी योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहचवताना काही केंद्र चालक लूट करत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई हीच काळाची गरज आहे तसेच खेड्यापाड्यात सुध्दा काही बोगस केंद्र आहेत त्यांच्या वर सुद्धा तपासणी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनते कडून करण्यात येत आहे कारण छोट्या, छोट्या कामाला आव ना बाव लुट करण्यात येत आहे असे चर्चा सर्वसामान्य जनते मध्ये करण्यात येत आहे .





















