स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणाची शिरूर तालुक्यात पुन्हा पुनरावृत्ती व्हायला/ नको-शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा/हटकरवाडी / भानकवाडी परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प बंद करणार :- सोपान मोरे
शिरूर/प्रतिनिधी
तालुक्यात पुन्हा पुनरावृत्ती व्हायला नको, शिरुर कासार तालुक्यातील रायमोहा / हटकरवाडी /भानकवाडी परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प बंद करा असे आवाहन प्रसिद्धस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शिवसेना तालुकाप्रमुख सोपान मोरे यांनी केले.पुढे सांगितले की, सौरऊर्जा प्रकल्पाची दादागिरीने शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी हडपल्या . बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प लुटारुची टोळी शेतकऱ्यांच्या जमिनी जोर जबरदस्तीने लाटल्या गेल्या. आदिलशाही/मोगल शाही / फिरंगी पोर्तुगी / इंग्रज यांच्या काळात देखील हाच प्रकार असायचा हीच मोगलशाही असायची म्हणून छत्रपती शासन लागू झाले. आणि आजही तीच वेळी आली असं वाटायला लागले. कारण स्वतःच्या बाप दादाच्या जमिनीमध्ये जर स्वतःलाच पाऊल ठेवता येत नाही तर ही गुलामीच. पण याद राखा शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका प्रमुख सोपान मोरे या नात्याने आम्ही हा प्रकल्प बंद केल्याशिवाय राहणार नाही.कारण पर राज्यातून येऊन आपल्या शिरुर व तालुक्यामधील हटकरवाडी, भानकवाडी य गावाच्या डोंगर माथ्यावर येऊन त्या शेतकरी कारण पर राज्यातून येऊन आपल्या शिरूर कासार तालुक्यामधील हटकरवाडी, भानकवाडी या गावाच्या डोंगर माथ्यावर येऊन त्या शेतकरी बांधवांच्या जमिनी हडप करीत असतील, त्यांच्या जमिनीमध्ये त्यांच्याच बापाच्या जमिनीमध्ये जर समजा हा पर राज्यातून येऊन माणूस त्या शेतकरी बांधवांना जमिनीमध्ये येऊ देत नसेल तर, मग मी तरी का हातामध्ये दांडके घेऊन याची सौर ऊर्जा कंपनी फोडून शिरूर तालुक्यातून हद्दपार का करू नये ? असा संतप्त सवाल केला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांच्या आदेशाने विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, संपर्कप्रमुख बीड जिल्हा परशुराम जाधव, संपर्कप्रमुख डॉक्टर लक्ष राज सानप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आजिनाथ खेडकर या सर्वांच्या सहकार्याने शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा, हटकरवाडी, भानकवाडी परिसरातील शेतकऱ्यावर जो अन्याय, दडपशाही, हुकुमशाही सौर ऊर्जा कंपनी कडुन चालू आहे, ती आम्ही उधळून लावुन भानकवाडी परिसरातील सौरऊर्जा हा प्रकल्प आम्ही बंद करणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिरुर क तालुकाप्रमुख सोपान मोरे यांनी पत्रकात सा आहे.





















