श्री. छत्रपती शाहू माध्यमिक (अ. जा )आश्रम शाळा बर्दापूर च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड!
बदापुर प्रतिनिधी/रोफ आतार
दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 रोजी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. श्री. छत्रपती शाहू माध्यमिक (अ. जा ) आश्रम शाळा बर्दापूर च्या विद्यार्थ्यांनी वयोगट 14 वर्षे थाळी फेक या क्रीडा प्रकारात किरवले प्रेम याने द्वितीय क्रमांक मिळवला व त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तर हर्डल ( अडथळा शर्यत ) या क्रीडा प्रकारात रोहित जगताप याने तृतीय क्रमांक मिळवून तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले. वरील विजय संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.दिगंबरजी गवळी साहेब व संस्थेची सचिव ओमप्रकाशजी गवळी साहेब तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सचिन व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळे बापूदेव तसेच या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे शाळेतील क्रीडा शिक्षक धुमाळ नानासाहेब शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





















