शरद इंगळे पाटील यांची चिंचोली माळी पंचायत समिती उमेदवारी साठी खा.सोनवणे यांच्या कडे मागणी !
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील साळेगाव येथील युवा नेतृत्व शरद इंगळे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या कडे चिंचोली माळी पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मागणीचा अर्ज केला आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शरद इंगळे पाटील यांनी उमेदवारी अर्ज पंचायत समिती गण चिंचोली माळी उमेदवारी मिळण्यासाठी केला आहे इच्छुक उमेदवार शरद विजयकुमार इंगळे पाटील खा. बजरंग बप्पा सोनवणे वरील विषय विनंती करतो की मला चिंचोली पंचायत समिती गटाची उमेदवारी देण्यात यावी मी इथून पाठीमागच्या संपूर्ण निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत राहिलो ते पण एकनिष्ठ राहिलो निस्वार्थपणे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची एकनिष्ठ राहिलोज्ञतरी प्रथम प्रधान्य मला देण्यात यावे अशी मी मागणी करतो ते तुम्ही मला द्याल हा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे शरद इंगळे पाटील यांनी अर्जाद्वारे म्हटले आहे.





















