Homeताज्या बातम्याविजय घाडगे यांच्या वरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी छावा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन/घाडगे यांच्या जिवितास...

विजय घाडगे यांच्या वरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी छावा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन/घाडगे यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार — शिवाजी (दादा) ठोंबरे

विजय घाडगे यांच्या वरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी छावा संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन/घाडगे यांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार — शिवाजी (दादा) ठोंबरे

केज/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात गुंडा राज पहावयास मिळत असुन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात पाठवलेले आमदार महोदय ऐशोआरामात ऑनलाईन रम्मी खेळत असल्याचे व्हिडिओ प्रसारमाध्यमावर साऱ्या जगाने पाहिले. मात्र हे कृत्य लपविण्यासाठी त्या घटनेचा निषेध करणाऱ्या छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी लातूर येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी (अ.प) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न विचारल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी (अ.प.) गटाच्या गुंडशाही प्रवृत्तीच्या गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या जिवितास काही धोका निर्माण झाल्यास त्यास शासन आणि प्रशासन जबाबदार राहील. अशा आशयाचे निवेदन छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख मा. शिवाजी दादा ठोंबरे यांनी केज तहसीलदार यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या बाबत अधिक माहिती अशी की जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी जनतेच्या हिताचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडुन ते सोडविण्यासाठी त्यांना सभागृहात पाठवलेले असते मात्र निवडुन येण्यापुर्वी मतांची भीक मागुन राजगादी वर मजा मारणारे आमदार, मंत्री हे जनतेला जनतेच्या समस्या,त्यांचे प्रश्न विसरून जातात. आणि अधिवेशनाच्या काळात त्यांना सर्व सुखसोयी, भत्ते मिळत असल्याने ऐसी लावलेल्या विधानभवनाच्या सभागृहात कोण झोपा काढतात तर कोणी मोबाईल वर गेम खेळतात, अशाच प्रकारची घटना नुकतीच राज्याच्या पावसाळी अधिवेशनात घडली . राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे हे अधिवेशन सुरू असताना आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना हे मात्र त्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन जंगली रम्मी खेळत असल्याचे व्हिडिओ सभागृहाबाहेर आले. आणि पहाता पहाता हे व्हिडिओ सर्वत्र प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले. ते साऱ्या जगाने पाहिले आहेत. त्यावर बरेच वादंग निर्माण झाले. या घटनेचा विरोधी पक्षाकडून आणि सामाजिक संघटनांकडून निषेध होवु लागला. त्यात हा मुद्दा छावा संघटनेने उचलत शेतकऱ्यांची बाजू मांडणारे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी वरील घटनेचा निषेध व्यक्त करत  लातूर येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी (अ.प.) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना शेतकऱ्यांच्या हिताचे व समस्यांचे निवेदन देऊन शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पिक विमा, हमीभाव, पीक नुकसान भरपाई अनुदान इत्यादी विषयाचे निवेदन दिले . तसेच छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी शेतकरी सन्मानार्थ प्रश्न विचारल्याच्या कारणावरून त्यांना राष्ट्रवादी (अ.प.) या गुंडशाही प्रवर्तीच्या गुंडांनी प्राण घातक हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे.त्यामुळे विजयकुमार घाडगे यांच्या जिवितास धोका निर्माण झाला तर त्यास शासन आणि प्रशासन जबाबदार राहील. अशा आशयाचे निवेदन  छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख मा. शिवाजी (दादा) ठोंबरे यांनी काल दि. २२ जुलै मंगळवार रोजी केज तहसीलदार मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून या घटनेची गंभीर दखल न घेतल्यास छावा संघटनेच्या वतीने राज्यभरात तिव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन दिला आहे. निवेदनावर छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख मा. शिवाजी (दादा) ठोंबरे, योगेश्वर अंबाड, रामहरी कोल्हे, दिगांबर नाना तपसे,ओम सपाटे, सुनील कापरे, प्रविण पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!