मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चाल, पोलिसांना करायला लावली मराठा वेशभूषा परिधान!
मुंबई/प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणावा आज चौथा दिवस आहे. राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाच्या मोठ्या उपस्थितीमुळे आंदोलनाला आणखी उर्जा मिळत असताना, जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. उद्यापासून त्यांनी पाणीही पिणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या आमरण उपोषणाची तीव्रता वाढवली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाच्या मोठ्या उपस्थितीमुळे आंदोलनाला आणखी उर्जा मिळत असताना आंदोलन मोडीत काढण्याचा डाव फडणवीस यांनी रचला तो म्हणजे चक्क पोलिसांना मराठा वेशभूषा परिधान करायला लावली व मराठा बांधवांच्या गाड्या परत पाठवायला पाटलांनी सांगितले आहे असे म्हणा असे पोलिसांना सांगितले परंतु कुठलाही विचार नाही करता मराठा समाज बांधवांनी मुंबईत घुसावे असे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.





















