बस आडवून चालक वाहक यांना मारहान पोलिसात गुन्हा दाखल !
अंबाजोगाई /प्रतिनिधी
दिनांक १३/११/२५ रोजी अंबाजोगाई आगाराची अंबाजोगाई ते आपेगाव जाणारी बस क्रमांक एम एच 20 बी एल 28 19 या बसने अंबाजोगाई ते कोळ कानडी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाने चिल्लर पैशाच्या देवानघेवाण यातून झालेल्या शाब्दिक चकमकी चा मनात राग धरून हीच बस आपेगाव ते अंबाजोगाई येत असताना कोळ कानडी येथे सदर बस अडवून वाहक व चालक यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली .तुम्ही आम्हाला शिवीगाळ का करत आहात अशी विचारणा चालक वाहकाने केली असता बसचे वाहक श्री प्रभू रावण गीते राहणार नंदागौळ यांना खाली ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली वाहकास मारहाण करत असल्याचे पाहून सोबतचे बस चालक श्री गणेश वसंतराव लव्हारे राहणार पट्टीवडगाव हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही संबंधित प्रवाशाने शिवीगाळ करून मारहाण केली म्हणून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी सातलिंग गंगाधर बागल राहणार कोळ कानडी याचे विरोधात कलम 132 121 352 नुसार वाहक श्री प्रभू गीते यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत .





















