बर्दापूर ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छता अभियान, सरपंच सौ,अनिताताई मोरे यांचे संकल्प!
बर्दापूर /प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले स्वच्छता अभियान सरपंच सौ अनिताताई विकास मोरे, तसेच ग्रामविकास अधिकारी खामकर साहेब आदर्श मैत्री फाउंडेशन चे स्वच्छता समिती फाउंडेशनचे अध्यक्ष, हनुमंत मोरे, विनोद गंडेल, विकास काका मोरे, शेख शबीर,रोफ आतार पत्रकार ग्रामपंचायतचे कर्मचारी व अंगणवाडी कार्यकर्त्या आशाताई यांनी सहभाग घेतला प्रथम महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सरपंच अनिताताई यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानात राबविण्यात आले,या अभियानात गावकऱ्यांनी उत्साहात असे सहभाग नोंदविला





















