पोलिस अधीक्षक काॅवत साहेब नेकनुर,केज पोलिस स्टेशनचा मनमानी कारभार?कॅरेक्टर खराब करून टाकेन, शेतकऱ्याला पोलिसाची थेट धमकी!
बीड/प्रतिनिधी
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला अद्यापही गाजतोय. पवनचक्की कंपनीच्या वादातूनच 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणातील बहुतांश आरोपी पकडले गेले असले तरी एक अद्याप फरार आहे. बीडमधील या खुनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर तेथील गुंडगिरी, दडपशाही , अनेक गुन्ह्यांच्या घटना सातत्याने समोर येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सतत असते. ते दहशतीखाली जगत असतात.आता याच बीडमधील आणखी एक कारनामा समोर आला आहे. पवनचक्की कंपनीकडे मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसानेच धमकी दिली आहे. कॅरेक्टर खराब करून टाकेन बेट्या अशी धमकी पोलिसांनी दिली असून कायद्याचे रक्षक हेच आता भक्षक बनत असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.कॅरेक्टर खराब करून टाकेन बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील कानडी घाट येथील शेतकरी गणेश झोडगे आणि कृष्णा कुडके यांच्या शेतातुन O2 RENEWABLE या पवनचक्की कंपनीचे वीज पुरवठा करणारे टॉवर आणि तार जात आहे. कंपनीने मावेजा दिला नाही म्हणून काम करू नका असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी काम थांबवलं असता, दत्ता बळवंत, सचिन मुरूमकर आणि सचिन गर्जे हे नेकनूर पोलीस स्टेशनचे तीन पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. शेतकऱ्यांशी त्यांचं बोलणं सुरू होतं, मात्र तेव्हा बोलता बोलता वाद वाढला आणि पोलिसांनी त्याला थेट धमकीच दिली.पोलीस कर्मचारी दत्ता बळवंत यांनी तरुण शेतकऱ्याला थेट धमकी दिली, तुझं कॅरेक्टर खराब करून टाकीन बेट्या, अशा शब्दात त्यांनी त्या शेतकऱ्याला धमकावल्याचं समोर आलं आहे. याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.यानंतर पोलीस दत्ता बळवंत यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता. तो व्हिडिओ आमचाच असून शेतकरी टॉवरचे नटबोल्ट काढत होते. आम्ही त्यांना कायदेशीर तक्रारी करून रीतसर तुमचा जो मावेज आहे तो मिळवा असं म्हणत होतो मात्र ते ऐकत नव्हते अशी प्रतिक्रिया दिली आहे.





















