तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर? मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल !
बीड/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वतः जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर केला आहे. आता, श्री क्षेत्र नारायण गड यांच्यावतीने उभारल्या जाणाऱ्या मंगल कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी, भूमिपूजन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं, तर अजित पवारांना देखील इशारा दिला आहे. तसेच, आता आधी धनंजय मुंडे आणि माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून धनंजय मुडेंना स्टार प्रचारक बनविण्यात आलंय. त्यासंदर्भाने मनोज जरागे यांना प्रश्न विचारला असता, धनंजय मुंडेला डोनाल्ड ट्रम्पसोबत पाठवलं तरी मला हरकत नाही. मात्र, त्याला आधी तपासणीसाठी पाठवावे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.





















