जरांगे पाटलांचा उपमुख्यमंत्री अजितदादा यांना टोला, दोन-चार महीण्यातच जिरली का -मनोज जरांगे पाटील
बीड/प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी बीडचं पालकमंत्रीपद सोडण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार काल बीड दौऱ्यावर होते.सकाळपासूनच अजित पवारांनी विकासकामांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणी जात लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. दरम्यान, स्थानिकांच्या तक्रारी ऐकून अजित पवार यांचा पारा चढला. यानंतर अजित पवारांनी थेट पालकमंत्रीपद सोडण्याची भाषा केली. तसेच मी बीड दौऱ्यावरून रिटर्न जातो, असंही ते म्हणाले त्या नंतर संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की पालकमंत्री पद का नको तुम्हाला आम्हाला तर वाटल होत अजितदादा मर्दा सारखे आहेत बीड जिल्ह्यातील वाढत्या गुंड गिरीला सरळ करतील परंतु दोन चार महिन्यांतच जिरली का असे मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.





















