Homeताज्या बातम्याछत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नायगावात भव्य रक्तदान शिबिर ; 26 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त...

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त नायगावात भव्य रक्तदान शिबिर ; 26 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

केज/ प्रतिनिधी

केज तालुक्यातील नायगाव येथे संघर्ष युवा ग्रूपच्या माध्यमातून राहुल खोडसे यांच्या पुढाकाराने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. हनुमान मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास युवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात एकूण 26 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे, संघर्ष युवा ग्रूपच्या माध्यमातून राहुल खोडसे यांच्या पुढाकाराने मागील आठ वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून हा स्तुत्य उपक्रम कायम सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणाऱ्या संघर्ष युवा ग्रूपच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादन न करता मानवसेवेच्या माध्यमातून समाजाप्रती कर्तव्य जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी उमेश खोडसे, शशिकांत खोडसे, मुकुंद माचवे, अमोल खोडसे, धम्मपाल होके, नितीन खोडसे, शुभम गुजर,सुरेश खोडसे,अशोक महामुनी,भारत बिटले,पवन खरात,कमलाकर चव्हाण,समाधान खोडसे,प्रवीण खोडसे,विशाल खोडसे,पत्रकार दत्ता मुजमुले सह पदाधिकारी उपस्थित होते शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अंबाजोगाई येथिल स्वरातीच्या सर्व डॉक्टर टीमने सहकार्य केले तसेच आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद !

गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद ! सोलापूर/प्रतिनिधी स्वच्छ गाव-सुंदर गाव या ब्रीद वाक्याखाली मौजे पाकणी येथे गेले एक ते दीड महिन्यापासून प्रत्येक रविवारी...

एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित...

एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित ? सोलापूर प्रतिनिधी/अजित सुरवसे उत्तर सोलापूर येथील सीना नदीत एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी...

मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी...

 मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं ! बीड/प्रतिनिधी मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे...

error: Content is protected !!