चिंचोली माळी जिल्हा परिषद शाळेचा मनमानी कारभार/मुख्याध्यापक कोण आहे कळेना?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार सुरू झाला आहे कारण चिंचोली माळी जिल्हा परिषद शाळेत नेमके कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण चिंचोली माळी जिल्हा परिषद शाळेत काही कागदपत्रे पाहिजे असेल तर हा शिक्षक यांच्या कडे बोट दाखवतात तर दुसरे शिक्षक दुसऱ्या शिक्षका कडे बोट दाखवतात असा प्रकार चिंचोली माळी जिल्हा परिषद शाळेत सुरू झाला आहे तसेच विद्यार्थी काय शिकतात याकडे कोणत्याही शिक्षकांचे लक्ष नसते सगळे शिक्षक आपल्या मनानुसार कारभार सुरू असतो म्हणजे मुख्याध्यापक कोण आहे हे शाळेतील शिक्षकांना माहीत नाही त्यामुळे शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे त्यामुळे केज गटशिक्षणाधिकारी यांनी चिंचोली माळी जिल्हा परिषद शाळे कडे लक्ष घालण्याची गरज भासत आहे.





















